आजच्या विद्यार्थ्याकडे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची नैसर्गिक क्षमता आहे हे सत्य सर्वमान्य आहे. अशा वेळी या विद्यार्थ्यांसाठीची शिक्षणपद्धती ही २० व्या शतकातील असून चालणार नाही, तर ती आजच्या काळाशी सुसंगत, विद्यार्थ्यांच्या कृतीशील सहभागाला अधिकाधिक प्रोत्साहन देणारी, त्यांच्या तंत्रविश्वाला समाविष्ट करून घेणारी अशी असायला हवी. त्यामुळेच शिक्षणक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर प्रशासकीय कामकाजासाठीच मर्यादित न राहता, मूळ शिक्षणप्रक्रियेत समुचित अशा माहिती तंत्रज्ञानाचा समावेश होणे आता अपरिहार्य आहे.

किंबहुना अशा वापरामुळे रचनावादी शिक्षण विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक वैयक्तिक आणि सांघिक उपक्रमांची आणि संधींची रेलचेल करणारे, अर्थपूर्ण, वेधक आणि एकाच वेळी स्थानिक. वैश्विक आणि आभासी वास्तवाला भिडणारे होऊ शकेल.

या पार्श्वभूमीवर, ‘MKCL eSchool’ या तंत्रज्ञानावर आधारित नवीन शैक्षणिक संरचनेची मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना रचनावादी पद्धतीने शिकता यावे या उद्देशाने MKCL eSchool ची रचना करण्यात आली आहे.

MKCL eSchool चे रचनावादी शिक्षण शिक्षककेंद्री नाही, शाळाकेंद्री/व्यवस्थाकेंद्री नाही, विषयकेंद्री (अभ्यासक्रमकेंद्री) नाही, आशयकेंद्री/पुस्तककेंद्री नाही, परीक्षाकेंद्री/गुणकेंद्री नाही, प्रमाणपत्र/पदवी/स्टेटस केंद्री नाही, मर्यादित तांत्रिक कौशल्यकेंद्री किंवा उद्योगकेंद्री नाही. ते विद्यार्थीकेंद्री म्हणजे विद्यार्थीविकासकेंद्री आणि समाजविकासकेंद्री असणे अपेक्षित आहे.

MKCL eSchool हे ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती रुजवविण्यासाठीचे एक समुचित टेक्नॉलॉजीकल परिवर्तन आहे. ते शिक्षणाच्या चालू प्रक्रियेचे रीइंजिनीअरिंग आहे!

In light of the COVID-19 pandemic, we are providing FREE access to ‘आय. टी. त मराठी, ऐटीत मराठी’ course

MKCL eSchool - Enriching School Experience

View Offerings